लोणावळा : लोणावळ्याची लेक असलेल्या ज्योती कंधारे हिने एशियन पाॅवरलिफ्टींग 2022 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी यश संपादन करीत भारताचा झेंडा रोवला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू मधील कोईमतूर येथे पार पडलेल्या आशियन पाॅवरलिफ्टींग 2022 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 52 किलो वजनी महिला मास्टर गटात भारताला “सुवर्ण पदक” मिळवून दिले. तसेच याच स्पर्धेत “स्ट्रांग वुमन ऑफ आशिया” हा पुरस्कार पटकवीत दुहेरी यश संपादन केले. या यशाच्या नंतर ज्योती कंधारे यांनी त्यांचे प्रशिक्षक अशोक मते यांचं विशेष आभार मानले. ज्योती कंधारे यांनी पाॅवरलिफ्टींग या प्रकारात आतापर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळून 28 पदक मिळवलेली आहे. यात 11 सुवर्णपदकांचा समावेश आहे.