लोणावळा : दिनांक 31 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आयआयएपीएल-१३ स्पर्धेत लोणावळ्यातील आर्किटेक्ट सौरभ राणे आणि गणेश तिकोने यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना टेबल टेनिस आणि क्रिकेट मध्ये अनुक्रमे यश मिळविले.
टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात महाराष्ट्राला कर्नाटकविरुद्ध ४-३ असा पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सौरभ राणे आणि निखिल धारप यांनी कर्नाटकच्या अक्षय बसावा आणि दर्शन अलादकट्टी जोडीचा सरळ सेटमध्ये (११-६, ११-९, ११-७) पराभव केला. साखळी फेरीत महाराष्ट्राने पंजाब आणि केरळ संघाचा पराभव केला. सौरभ राणेने साखळी फेरीत दोन दुहेरी आणि दोन एकेरीचे सामने जिंकले
क्रिकेटमध्ये महाराष्ट्र ‘ब’ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गणेश तिकोनेने साखळी सामन्यात आसाम संघाविरुद्ध २१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. गणेशला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. साखळी फेरीत महाराष्ट्र ‘ब’ संघाने ओडिशा संघाचा पराभव केला तर तामिळनाडू संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.