लोणावळा : येथील श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या वतीनं नागरिकांसाठी विविध आजार आणि व्याधींवर मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जाणार असून हृदयरोग येण्याची लक्षणे व त्यावरील प्राथमिक उपचार या विषयावर सुप्रसिद्ध डॉ. विजय गाला यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार असल्याची माहिती विश्वस्त काशीप्रसाद मुरारका यांनी दिली.
सुप्रसिद्ध नारायणी धाम मंदिराच्या शेजारी असलेल्या मधूसुदन झुनझुनवाला हेल्थ केअर सेंटरमध्ये रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरात त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, स्त्रिरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, नेत्ररोग तपासणी, थॉयराईड तपासणी, मधुमेह तपासणी, अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी, जनरल तपासणी केली जाणार आहे.
ज्या रुग्णांना छातीत धडधड होते, छातीत दुखणे, चालताना दम लागणे त्यांनी ह्या शिबीराचा नक्कीच लाभ घ्यावा. या शिबीरात मुंबई, पुणे, लोणावळा येथील नामवंत डॉक्टरांच्या द्वारे तपासण्या केल्या जातील तसेच आपलं नाव या आरोग्य शिबिरात नोंदवण्यासाठी ९३२११४०४७६ / ९३२११४०४७९ हे क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायणी सेवा संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीनं करण्यात आले आहे. सोबत येताना पेशंट ने आपले जुने केस पेपर असल्यास तेही सोबत आणावे असे देखील सांगण्यात आले आहे.