तीन वर्षे फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या अवळण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश
लोणावळा : बेकायदेशीर रित्या अवैध शस्त्र जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांना हवे असलेले आणि मागील तीन वर्षांपासून फरारी असलेल्या चार आरोपींच्या मुसक्या अवळण्यात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1097/2020 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),(3),135 व मोटार वाहन कायदा कलम 66(1),192 या कलमाखाली पोलिसांना प्रसाद गणेश पवार, गणेश वाघमारे, संदेश जाधव व धनंजय टकले (सर्व रा. तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे) हे चार आरोपी हवे होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तळेगाव दाभाडे परिसरात शोध घेऊन या चारही आरोपींना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाळुंजकर, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खैरे व पोलीस कॉन्स्टेबल सिद्धू शिंदे यांनी सदरची कारवाई केली.