लोणावळा : येथील मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय समाजामध्ये महिलांसाठी तसेच स्वच्छतेसाठी भरीव आणि उत्तम कार्य करीत असलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लोणावळा शहरातील प्रियदर्शनी संकुल, गावठाण येथे लायन्स क्लब ऑफ डायमंड या संस्थेच्या मार्फत महिलांना नाकातील नथ बनवण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. या प्रशिक्षणाचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. संस्थेच्या अध्यक्ष रेशमा शेख यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले शिवाय प्रशिक्षण देखील त्यांनीच दिले. या प्रशिक्षणात सहभागी सर्व महिलांना फुलांचे गजरे देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून बचत गट वडगाव मावळ मधील पाच गट व शहरी भागातील बचत गटातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोबतच स्वच्छतेच्या क्षेत्रात कचरा वेचक तसेच झाडलोट करीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एकूण 20 महिलांना प्रमाणपत्र आणि साडी देऊन गौरविण्यात आले. तालुक्यातील पहिली रिक्षा चालक असलेल्या महिलेचा देखील यावेळी विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
लायन लाइन्स क्लब ऑफ डायमंडच्या सचिव तसनीम थासरावाला, खजिनदार वंदना अग्रवाल, झोन चेअरमन पर्सन आनंदा गायकवाड, कॅबिनेट मेंबर डाऊन थसरावाला, राजेश अग्रवाल, स्मिता गायकवाड, शारदा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लोणावळा नगरपरिषद आरोग्य विभागाचे विनोद बोरकर तसेच शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन केले.