लोणावळा : लोणावळा शहरात अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल युटोपिया हाय व हॉटेल कुमार रिसॉर्ट याठिकाणी तर लोणावळा ग्रामीण हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा याठिकाणी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई करीत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय हुक्क्यासाठी लागणारा सुमारे 93 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल युटोपिया डाईन हाय व कुमार रिसॉर्ट तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेल्समध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे शनिवारी दिनांक 16 मार्चच्या रात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह लोणावळा शहर हद्दीतील हॉटेल युटोपिया डाईन हाय व हॉटेल कुमार रिसॉर्ट याठिकाणी तर लोणावळा ग्रामीण हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा याठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी हॉटेलचालक हे सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आले. तिन्ही हॉटेलमधून हुक्का पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप ई. असा एकूण 93530 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पो.स्टे येथे रुस्तम वकील अहमद (वय 22 वर्षे, रा.लोणावळा), रोशन मनोज यादव (वय 30 वर्षे, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुंगार्ली, लोणावळा), कृष्णा नाथा राठोड (वय 31 वर्षे, रा. कालेकर मळा, लोणावळा), प्रताप कृष्णा डिंमळे (वय 42 वर्षे, रा. कार्ला, ता. मावळ) व बिपीन्छु मार परमेश्वर महतो (वय 30 वर्षे, रा. भारती अपार्टमेंन्ट फ्लॅट नं.202 साईबाबा मंदीराजवळ शांतीनगर उल्हासनगर, ठाणे) यांचेविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण, पोसई रोहन पाटील, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना. सचिन गायकवाड, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो कॉ गणेश येलवंडे, पो कॉ काळे, पो कॉ टकले, पो कॉ माळवे, पो कॉ पवार, मपोकॉ चवरे, मपोकॉ शिंदे यांचे पथकाने केली आहे.