लोणावळा : भारतीय जनता पार्टीचा 44 वा वर्धापन दिन सोहळा 6 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात लोणावळा शहर भाजपा तर्फे साजरा करण्यात आला. इंद्रायणी नगर येथील भाजपा कार्यालयात सकाळी 11 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते अरविंद काका कुलकर्णी यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी साहिल हंसारे व त्याच्या सहकाऱ्यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश करीत मोदींजींचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजाभाऊ खळदकर यांनी केले तर सुत्रसंचालन अर्जुन पठारे यांनी केले. सेवा, समर्पण, व त्याग म्हणजे भारतीय जनता पार्टी असुन जगात एक नंबरचा पक्ष आज तुम्हा आम्हा सर्व सामान्य कार्यकर्तामुळे होऊ शकला आहे असं प्रतिपादन यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड यांनी केले.