लोणावळा : 07 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच दिवसाचे अवचित्य साधुन जयहिंद लोकचळवळ लोणावळा यांच्या मार्फत तुंगार्ली धरणाच्या जवळ असलेल्या आदिवासी कातकरी वस्तीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 90 ते 100 आदिवासी बांधवानी या शिबिराचा लाभ घेतला.
जयहिंद लोकचळवळ पुणे संघटक श्री. निखिल धनंजय कविश्र्वर ह्यांच्या मार्गर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. आतिश अर्जुन नेमाने ह्यांनी रुग्णांची तपासणी केली व औषध पुरवले. ह्याप्रसंगी चैतन्य वाडेकर, भारत चिकने, विनोद होगले, श्रवण चिकने, शुभम जोशी, निखिल भोसले, संजय तळेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.