लोणावळा : मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळच्या श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये समृद्धी राहुल काळे ही विद्यार्थींनी खुल्या संवर्गातून सातवी तर अनुसुचित जाती संवर्गातून संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिली आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतिने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिरातील समृद्धी राहुल काळे, प्रणाली दिपक नरवडे, ज्ञानेश्वरी संतोष हुलावळे, अनिशा गणेश गायकवाड, कृष्णा हरिचंद्र केदार या पाच विद्यार्थ्यांंची शिष्यवृती साठी निवड झाली असून या विद्यार्थांंना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक उमेश किसन इंगुळकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत शाळेचे 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून यावर्षी देखील पाच विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या व नु.म.वि. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जात असल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजने अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी कु श्रावणी उत्तम तरस, अनुष्का सोपान येवले, श्रृती गणेश देवकर, रोहित अंकुश हुलावळे, स्नेहा अनिल नाणेकर, गौरव सोमनाथ गायकवाड, मंथन गणपत ढाकोळ, कावेरी भोजराज तरोणे या विद्यार्थांंची निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरंपच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, संस्था संचालक मंडळ, सर्व कार्ला ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी तसेच कार्ला परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.