लोणावळा : येथील नामांकित लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस.एस.जी.जी. गुप्ता वाणिज्य, एस. एस. ए. एम. विज्ञान महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी नेहा राहुल पाळेकर यांची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापिठ अधिनियम २०१६ मधील कलम (९७) नुसार उद्योजक गटातून नियुक्ती करण्यात आली.
सौ. नेहा राहुल पाळेकर यांनी परदेशात (U.S.) उच्च शिक्षण पूर्ण केले असून हाय-टेक शेती, ग्रोसरी मॉल, रेसोर्ट व बांधकाम आदि क्षेत्रातील उद्योजक आहेत तसेच त्या अनेक शिक्षण संस्थामध्ये संचालक, महाविद्यालय विकास समिती सदस्य व अंतर्गत तक्रार समिती सदस्य अशा पदांवर कामकाज पाहतात. लोणावळा एज्युकेशनच्या सचिव अॅड. नीलिमा खिरे यांनी नवनियुक्त महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या नेहा राहुल पाळेकर यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले व त्यांस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, खजिनदार दत्तात्रय येवले, विश्वस्त नंदकुमार वाळंज, विश्वस्त श्रीमती शैला फासे, विश्वस्त सुनील ठोंबरे, सहसचिव अॅड. अजय भोईर, महाविद्यालय समिती सदस्य विशाल पाडाळे, माजी विद्यार्थी व उद्योजक राहुल पाळेकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा वापर करून मला लोणावळा शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील लोणावळा महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासास हातभार लावण्याची संधी मिळाली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.