लोणावळा : येथील सामाजिक कार्यकर्ते सनी राम दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा प्रभाग क्रमांक 1, न्यू तुंगार्ली विभागातील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा ‘होम मिनिस्टर’ या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता न्यू तुंगार्ली चौक, इंदिरानगर येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सौ. भाग्यश्री सनी दळवी तसेच सनी दळवी मित्र परिवार यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या सौभाग्यवती सारिका सुनील शेळके यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. राजेंद्र दिवेकर हे या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. या कार्यक्रमातील पहिल्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही आणि पैठणी, दुसऱ्या क्रमांकासाठी फ्रीज आणि पैठणी, तिसऱ्या क्रमांकासाठी वॉशिंग मशीन आणि पैठणी, चौथ्या क्रमांकासाठी इलेक्ट्रिक शेगडी आणि पैठणी व पाचव्या क्रमांकासाठी मिक्सर आणि पैठणी अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रत्येक सहभागी महिलेला एक आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. याशिवाय खेळाच्या दरम्यान एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्या महिलांना मोबाईल, सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला ही बक्षिसे दिली जाणार आहे.